Mumbai MVA Protest: महायुती सरकारचा निषेध करत मविआचं जोडे मारो आंदोलन! ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली.
Published by :
shweta walge

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्टला घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. पंरतु,एक वर्ष पूर्ण होण्याआधीच हा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या घटनेमुळे संपुर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे विरोधकांकडून महाराष्ट्र सरकारवर टीका टीपणी केली जात आहे. यातच आज या घटनेचा निषेधात महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात येतं आहे. तुरुंगात टाकलं तरीही चालेल पण आंदोलन होणारच असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला आहे. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com