Dadar Station : 'दादर स्टेशनला आंबेडकरांचं नाव द्या', सचिन खरात यांची मागणी

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये काही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबाबत प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये काही रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याबाबत प्रस्तावावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. परंतु दादर येथे संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आणि महापरिनिर्वाणभूमी आणि कर्मभूमी आहे.

याचमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आंबेडकरी समाज दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक करण्यात यावी अशी मागणी करत आहे. ही आंबेडकरी समाजाची भावना समजून घेऊन राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक करावे ही विनंती केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com