Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News
नरेंद्र पाटील यांनी जरांगे पाटील आणि राजेश टोपेंवर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगेंमुळे राज्यात मराठा आणि ओबीसी वाद सुरु झाला आहे. केंद्राने दिलेलं ईडब्लूएस आरक्षण मराठ्यांच्या हिताचं आहे असं त्यांनी म्हणालं आहे. राजेश टोपे यांनी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. आरक्षणाचा प्रवास जरांगे पाटलांनी सुरु केला नसून अण्णा साहेब पाटलांनी आरक्षणाची लढाई सुरु केली होती असं महत्त्वाचं वक्तव्य नरेंद्र पाटलांचं आहे.
यावर नरेंद्र पाटील म्हणाले, जरांगे पाटलांचं आधीचं आंदोलन हे समाजाला धरून होत. ज्यादिवशी खासदारकीला आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यावेळेला त्यांनी पहिल वक्तव्य केलं, सरकारमध्ये तीन पक्ष कार्यरत आहेत. एका पक्षाच्याचं नेत्याबद्दल भाष्य करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर हे समाजकरण हे राजकारणात रुपांतरीत झालेलं आहे. हे स्पष्टपणे दिसलेलं आहे.