Naresh Mhaske On Uddhav Thackeray : "आम्ही नाही उद्धव ठाकरे गटातील नेतेच शिवरायांचा अपमान करतात"

नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया: शिवसेना शिंदे गटाचे नेते उद्धव ठाकरे गटावर टीका
Published by :
Team Lokshahi

संजय राऊतांनी अमित शाहाच्या मुंबई दौऱ्यावर टीका केल्या होत्या. याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "मला वाटत नाही चंद्रकात पाटील अशा पद्धतीने बोलले असतील. मी काय त्यांचे वक्तव्य ऐकलं नाही. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटवाले रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका करत आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांना अब्दाली त्याचबरोबर महाराष्ट्राचे लुटारु बोलत आहेत. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. कालच अमित शाहा आले होते. त्यांच्यावर अशा पद्धतीने वक्तव्य संजय राऊत कसे करु शकतात. एवढ्या खालच्या स्तरावर आलेत की त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. अशा पद्धतीने वक्तव्य करुन अमित शहा यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रोध निर्माण करत आहेत", असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com