Naresh Mhaske : 'मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन दिल्लीत आले होते ; नरेश म्हस्केंचा ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर नरेश म्हस्केंनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला असं देखील नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर नरेश म्हस्केंनी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंचा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला असं देखील नरेश म्हस्के म्हणाले आहेत. मलाच मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन दिल्लीत आले होते. कॉंग्रेसने त्यांना हुसकावून लावलं, भाव दिला नाही असं देखील वक्तव्य नरेश म्हस्केंनी केलेलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुप्ता बंधू आता दिल्लीत ठाकरेंना भेटले इलेक्शन फंडासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूची भेट घेतली नसेल ना असा आरोप ही नरेश म्हस्केंनी उपस्थित केला आहे.

याचपार्श्वभूमीवर नरेश म्हस्के म्हणाले, आम्ही या दौऱ्याला लोटांगण दौरा म्हणतो. पाया पडण्यासाठी दिल्लीत आले होते आणि हातात कटोरा घेऊन आले होते, मला मुख्यमंत्री पदाचे दान द्या. पण मला वाटतं कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना काहीच भाव दिला नाही. ते याठिकाणी हे सुद्धा दाखवायला आले होते की, शरद पवारांनशिवाय माझ कॉंग्रेसमध्ये चालतं आणि महाराष्ट्रमध्ये माझं मूल्य जास्त आहे, हे सगळ दाखवण्यासाठी ते आले होते. मात्र त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. कॉंग्रेसने त्यांना जे मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवण्याचं सांगितलं होत त्याला आता नकार दिला आहे.

पण जे संजय राऊत आहेत ते उद्धव ठाकरेंना फसवत आहेत. उद्धव ठाकरेंना सोडून जे एकनाथ शिंदे आणि जे इतर आमदार गेले त्याच्या मागे देखील संजय राऊत यांचेच कटकारस्थान आहे. त्यांनी त्यासगळ्यांवर सक्ती केली त्यांच्या राजकारणी चालीने आणि राष्ट्रवादीत ते ज्यांच्या पायाजवळ काम करतात त्यांना मुख्यमंत्री बनवण त्यांच्या मनात आहे. कारण त्यांचा उद्धव ठाकरेंवर राग आहे. उद्धव ठाकरेंना फसवायचं त्यांची बदनामी करायची असे संजय राऊत यांचे कट आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com