व्हिडिओ
Narhari Zirwal | कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लग्न समारंभात गायल्या मंगलाष्टका; Video Viral
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बाळासाहेब जाधव यांच्या पुतणीच्या लग्न समारंभात मंगलाष्टका गायल्या; व्हिडिओ व्हायरल, पाहुण्यांना सुखद धक्का.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे नेहमीच आपल्या साधेपणाने ओळखले जातात. कधी उत्सवांमध्ये संबळ वाद्यावर नृत्य करणे असेल कधी कीर्तनात टाळ मृदंग घेऊन ठेका धरण असेल. कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव यांच्या पुतणीच्या लग्न समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नरहरी झिरवाळ यांनी भटजीबुवांच्या हातातून माईक घेत मंगलाष्टकाचे स्वर गायल्याने उपस्थित पाहुण्यांना सुखद धक्का बसला आहे.