video

Madhya Pradesh Rain : नर्मदा नदी धोक्याची पातळी ओलांडली; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नर्मदा काठावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मध्यप्रदेश आणि सातपुड्याचा डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीला पूर आला असून नर्मदा नदीने धोक्याची पातळी वरून वाहत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नर्मदा काठावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदी काठावरील गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. मनीबेली गावात जीवन शाळेपर्यंत नर्मदेचे पाणी पोहचले. नर्मदा नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ झाल्यास नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com