Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प

नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प झाला आहे. पिंपळगाव, चांदवड पाठोपाठ लासलगाव मध्येही कांदा लिलाव बंद झाल्याची माहिती समोर येत आहे. लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

लासलगाव मध्ये लिलावात 1700 ते 1800 भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याचे लिलाव बंद पाडत, नाफेडने प्रत्यक्षात लिलाव करण्याची मागणी यावेळी केली जात आहे. तसेच नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com