सरपंचानंतर माजी नगरसेवकाची व्यथा! वाल्मिक कराडचं नाव घेत थेट पोलीस स्टेशनमध्येच विषप्राशन
भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या माजी नगरसेवकाने कर्जत पोलीस ठाण्यातच विषप्राशन केल्याची माहिती मिळत आहे.
विष प्यायल्यानंतर त्यांना नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विष पिण्याच्या आधी त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. माजी नगरसेवक हे अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते.
भरत जाधव नेमकं काय म्हणाले?
मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो. 25 वर्षांच्या राजकारणात मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे. जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये.
कर्जत-जामखेड तालुक्यात मी कोट्यवधी रुपये टाकून जमीन घेतली. यामध्ये अनेकांनी कमिशन घेतलं. दत्ता पवार, रुपेश पवार यांनी झाडाचे आणि रस्ता काढून देण्याचे पाच-सात लाख रुपये घेतले. आता माझ्याच जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला. जेणेकरुन मला जमीन विकता येऊ नये. नरेंद्र झुरानी प्रकरणातही असेच घडले. मी नवी मुंबईत ज्याला लहानाचा मोठा केला, समाजात वावरायचं शिकवलं, कामं घेऊन दिली, पैसे दिले. या नरेंद्र झुरानीला दत्ता घंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव करण्यात आले. दत्ता घंगाळे यांनी मला गँगवॉरची धमकी दिली. नरेंद्र झुरानी मला फसवत आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना माहिती आहे. दत्ता घंगाळेची बायको माझी कॉलर पकडून मला धमकावते. विशाल डोळस, अभिलाष मॅथ्यू, सचिन शिंदे, अनिकेत हे मला भररस्त्यात शिव्या देतात. त्यांच्या कोणत्याही आर्थिक विषयात मी पडलेलो नाही. सरकारने नरेंद्र झुरानी यांनी केलेल्या कामाची आणि वॉर्ड नंबर 108 मधील केलेल्या कामांची चौकशी करावी.