Amravati Lok Sabha : अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकरांची लढत?

प्रकाश आंबेडकरांचा मुलगा लोकसभेत उतरण्याची चर्चा रंगली आहे. सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

प्रकाश आंबेडकरांचा मुलगा लोकसभेत उतरण्याची चर्चा रंगली आहे. सुजात आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अमरावतीत नवनीत राणा आणि सुजात आंबेडकरची लढत होण्याची शक्यता आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून सुजात आंबेडकर हे निवडणूक लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसाभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडी बरोबर जाण्याची शक्यता असून वंचितने ५ जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे .यामध्ये अमरावती मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजाता आंबेडकर हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com