व्हिडिओ
Ajit Pawar CM Banner : राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना पुण्यात अजित पवार यांचे बॅनर झळकले आहेत.
अजित पवारांचे वारजे चौकात मोठे फ्लेक्स लागले आहेत. भावी मुख्यमंत्री असा या बॅनरवर उल्लेख आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना पुण्यात अजित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. बॅनरवर अजित पवार भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांचे समर्थक सचिन खरात यांच्याकडून बॅनरबाजी केल्याची माहिती समोर येत आहे.