व्हिडिओ
NCP New MLA Ministers : राष्ट्रवादीतून नव्या चेहऱ्यांना संधी?
राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष, मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता.
राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तावली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ही संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या वाटेला 9 ते 11 मंत्रिपद येण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेते सध्या अस्वस्थ आहेत अशी माहिती समोर आली आहे. तर शिंदे सरकारमधील सर्वच माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा आहे. पण यंदा काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. आता या नव्या चेहऱ्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार याची धाकधूक मात्र ज्येष्ठांमध्ये पाहायला मिळत आहे.