Pune : पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी; दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बाबुराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आले आहे.
जयेश मुरकुटे याने या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. बाणेर येथील रस्त्याचे आणि पाईप लाईनचे काम अधिकृतपणे करा असे सांगितल्यामुळे त्याचा राग मनात धरून चांदेरे यांनी शिवीगाळ, धमकी दिली आणि अंगावर धावून गेले असा आरोप करण्यात आला आहे. बाबूराव चांदेरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत.
Summery
अजित पवारांच्या पदाधिकार्याने शरद पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला दिली धमकी
बाबुराव चांदेरे आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ , धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप
जयेश मुरकुटे याने बाणेर पोलीस ठाण्यात दिली तक्रार
