NCP Melava : राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा, मनसेचे महेश जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा सुरु होणार आहे. अजित पवारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित असतील. लोकसभेच्या अनुषंगाने मेळाव्याला महत्त्व आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नवी मुंबईत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक विश्वास मेळावा सुरु होणार आहे. अजित पवारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित असतील. लोकसभेच्या अनुषंगाने मेळाव्याला महत्त्व आहे. मेळाव्यात मनसेचे महेश जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी काळामध्ये पक्षाचा विस्तार आणि संघटना पातळीवर मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार आज महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सेलच्या वतीने नवी मुंबई येथे अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे आणि सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने हा विश्वास मेळावा असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईमध्ये अजित दादांसोबत जिल्हाध्यक्षांचा अनेक कार्यकर्ते पहिल्या पासून सोबत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com