Dr. Babasaheb Ambedkar Statue At Indu Mill : इंदू मिल स्मारकासाठी 2026 ची नवी डेडलाईन

मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे 2026 पर्यंत पूर्ण होईल.
Published by :
Team Lokshahi

मुंबईतील इंदु मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे आतापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे स्मारक मे 2026 पर्यंत पूर्ण होईल,असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीएने) केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2015 मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मारकाचे काम 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com