व्हिडिओ
Suresh Dhas |देशमुख कुटुंबियांच्या आक्षेपानंतर नवी SIT स्थापन, सुरेश धसांची माहिती
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय, सुरेश धस यांनी दिली माहिती. देशमुख कुटुंबीयांच्या आक्षेपानंतर जुन्या एसआयटीच्या जागी नवीन तपास पथकाची स्थापना.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली आहे. या आधीच्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचे आणि संपर्कातील अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता देशमुख कुटुंबीयांच्या आरोपानंतर या प्रकरणाचा तपास नवीन एसआयटी करणार आहे.