Chandrapur : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या गाड्या;पर्यटकांसाठी आता 10 नव्या गाड्या उपलब्ध

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीसाठी नव्या पर्यटन वाहनांची उपलब्धता झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीसाठी नव्या पर्यटन वाहनांची उपलब्धता झाली आहे. जिल्ह्यातील महसूल यंत्रणेसाठी देखील दहा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल करण्यात आले. ताडोबाच्या पर्यटनात गुणात्मक वाढ व्हावी, यासाठी वनविभाग प्रयत्नशील असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली. ताडोबात साडेसात हजार विद्यार्थी तर राज्यभरातील विविध अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात 75 हजार विद्यार्थ्यांना मोफत वनपर्यटन व पर्यावरण शिक्षण अनुभव देण्याची घोषणा त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com