Nilesh Lanke Beed : पवारसाहेबांची पावसातील सभा परिवर्तन घडवणारी, 'मविआ'चं सरकार येणार : लंके

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते निलेश लंके यांनी राज्यात मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असे वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांची पावसातील सभा परिवर्तनाची आहे. राज्यात 'मविआ'चं सरकार येणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारसभांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा भरपावसात सभा झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी भरपावसात केलेले भाषण पुन्हा करिष्मा घडवणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते निलेश लंके यांनी राज्यात मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असे वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांची पावसातील सभा परिवर्तनाची आहे. राज्यात 'मविआ'चं सरकार येणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com