Niranjan Davkhare : कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंची हॅट्रिक, लोकशाहीला डावखरेंची प्रतिक्रिया

निरंजन डावखरेंनी रमेश कीर यांचा पराभव करून कोकण पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
Published by :
Team Lokshahi

निरंजन डावखरेंनी रमेश कीर यांचा पराभव करून कोकण पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यावर निरंजन डावखरे म्हणाले, ही महायुतीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते राज्यामध्ये काम करत आहेत. त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सरकार म्हणुन एकत्र काम करत आहेत. हा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे आणि ज्याच्याकडे खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्यालाच याच्यामध्ये यश येऊ शकतं. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं यश आहे. अशी प्रतिक्रिया निरंजन डावखरे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com