Nitesh Rane : केंद्र सरकार काय करतंय हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीत बसून कळणार नाही

बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारावरुन उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला सवाल केले आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पालघर साधू हत्याकांड घटनेची आठवण करून देत प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Team Lokshahi

हिंदूंच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचारावरुन त्यांनी मोदी सरकारला सवाल केले आहेत. एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवणारे पंतप्रधान बांगलादेशमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. तसेच भाजप नेते नितेश राणे यांनीही लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया पाहुयात-

जिहादीह्रदयसम्राट उद्धव ठाकरे यांना हिंदूंची आठवण आलेली दिसत आहे. ते मुख्यमंत्री असताना हीच भावना ठेवली असती तर पालघरमध्ये साधूंची हत्या झाली नसती. घटना घडल्यानंतरही हत्या करणाऱ्यांना शिक्षा देण्याची धमक ठेवली नाही. स्वत: च्या वडिलांच्या नावापुढे हिंदूह्रदयसम्राट बिरूद लावण्याची त्यांना लाज वाटायची. त्यांनी आता हिंदूंची काळजी घेऊ नये. बांगलादेशमधील हिंदूंची काळजी घेण्यासाठी आमचे पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. केंद्र सरकार काय करतंय हे उद्धव ठाकरेंना मातोश्रीत बसून कळणार नाही. विधानसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्यासारख्या धर्मांतर झालेल्या लोकांना हिंदूंची खरी ताकद कळली आहे. महाराष्ट्रावर देशावर राज्य करायचं असेल तर हिंदूंचंच हित पाहावे लागणार आहे हे आता त्यांना कळून चुकल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

सविस्तर बातमी पाहण्याासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com