व्हिडिओ
वाढदिवसाच्या ४ दिवस आधी नितीन देसाईंनी संपवलं जीवन
वाढदिवसाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना नितीन देसाई यांनी असा निर्णय घेतला
मराठी आणि हिंदी सिनेमाविश्व गाजवणारे अवलिया कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे २ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झाले. त्यांनी गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. ६ ऑगस्टला नितीन देसाई यांचा जन्मदिवस आणि वाढदिवसाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना त्यांनी असा निर्णय घेतला. आज जर ते असते तर त्यांनी ५८ वा वाढदिवस साजरा केला असता. वाढदिवसाच्या काहीच दिवस आधी त्यांची अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे.
६ ऑगस्ट २०२२ ला नितीन देसाई यांनी मोठ्या दणक्यात एनडी स्टुडिओमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. नितीन देसाईंच्या इन्स्टाग्रामवर आजही हे फोटो उपलब्ध आहेत. एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यासोबत काम करणारी टीम आणि जवळची मंडळी यावेळी उपस्थित होती. नितीन देसाई यांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोंमधून स्पष्ट दिसतोय.