Nitish Kumar : बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत दुसऱ्यांदा ते भाजपबरोबर जातील हे स्पष्ट झाले आहे.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. तीन वर्षांत दुसऱ्यांदा ते भाजपबरोबर जातील हे स्पष्ट झाले आहे. पाटण्यात शनिवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. राष्ट्रीय जनता दलाने नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीत पुन्हा गेल्यास रणनीतीबाबत चर्चा केली, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. भाजपचीही बैठक झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com