व्हिडिओ
धक्कादायक वास्तव! २७ हजार शाळा अंधारात, अनेक शाळा इंटरनेटविना
राज्यातल्या 27 हजार शाळा अंधारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातल्या 27 हजार शाळा अंधारात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात 65 हजार सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली शाळा आहेत. यातल्या 27 हजार म्हणजे जवळपास निम्म्या शाळांमध्ये वीज नाही. या शाळा अंधारात आहेत. साहजिकच वीज नसलेल्या शाळांमध्ये संगणक कसे असणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. केंद्रीय शिक्षण विभागाच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. प्रगत महाराष्ट्रात शाळा अधोगतीला गेलेल्या असल्याचं समोर आलं आहे.