कोंडेश्वर धबधब्यांवर पर्यटकांना ‘नो एण्ट्री!

पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती असलेल्या बदलापुरातील कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, बारवी धरण या वर्षी पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.
Published by  :
Team Lokshahi

बदलापूर : पावसाळ्यात पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती असलेल्या बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, परिसरात पर्यटक दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मात्र पर्यटकांना पोलिसांनी याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटक सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी जात असतात. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे जिल्हा व मुंबई शहरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. मात्र त्यांना इथल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने अनेकदा पाण्यात पोहण्याचा, भिजण्याचा आनंद घेत असताना यातील काहींना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. त्यामुळे अशा दुर्घटना घडू नये या पार्श्वभूमीवर कोंडेश्वर येथील मार्गावर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पोलीसांनी स्वतः जाऊन नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच पर्यटकांना याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com