Shrikant Shinde : 'विरोधी उमेदवार कोणीही असला तरी पूर्ण ताकदीने लढणार', श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य

विरोधात कोणीही उमेदवार असला तरी पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विरोधात कोणीही उमेदवार असला तरी पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये ओवर कॉन्फिडन्स येता कामा नये असं खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय. तसेच गेल्या वेळेपेक्षा आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचाही विश्वासही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये शिवसेना कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते. येणाऱ्या काही दिवसातच निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने आपण केलेल्या विकास कामे हे लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जनतेसमोर जायचं, गेली दहा वर्ष या कल्याण मतदारसंघात लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम केलीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com