Sunil Shukla On Raj Thackeray MNS : राज ठाकरे यांच्या मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी'; सुनील शुक्लांकडून याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
मराठी न बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणे, त्यांच्या विषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणे, द्वेष पसरवणे, दमदाटी करणे यामुळे मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. तसेच यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालय यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे.
"राज ठाकरे हे हिंदू विरोधी आहेत तसेच ते मराठी विरोधी ही आहेत. ते संविधानाचे विरोधक आहेत त्यामुळे मनसे संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्यांना ज्यांना मारहाण केली आहे ते सगळे हिंदू आहेत. त्यामुळे मी राज ठाकरेंचा विरोध करतो", असं सुनील शुक्ला म्हणाले आहेत.