Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

"वायकर हा एक ब्रांड आहे, कामाचा ब्रांड आहे आणि त्यामुळे कामाच्या ब्रांडला लोक नक्की मत देतील"
Published by :
Sakshi Patil

उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार आहेत. रविंद्र वायकर म्हणाले की, भावना चांगल्या आहेत. जनहित साधनं आणि देश सेवा करणं, हिच भावना घेऊन मी समाजामध्ये नगरसेवक झालो, आमदार झालो, आता खासदार होऊन देशाचं हित कसं साधता येईल, यासाठी जनतेने निवडून द्यावं. या अपेक्षेने देवळात आलो आहे. जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे, आज फॉर्म भरायचा आहे.

वायकर हा एक ब्रांड आहे, कामाचा ब्रांड आहे आणि त्यामुळे कामाच्या ब्रांडला लोक नक्की मत देतील आणि आशीर्वाद देतील. सर्वांनी प्रचाराला यावं आणि मोदी साहेबांना पंतप्रधान बनवावं, असं देखील ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com