OBC Reservation : ओबीसी संघटना आक्रमक; ओबीसींकडून सगेसोयरे जीआरची होळी

ओबीसी समन्वय समितीचा आरक्षणाला विरोध करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ओबीसी समन्वय समितीचा आरक्षणाला विरोध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची नांदेड मध्ये ओबीसी समन्वय समितीकडून होळी करण्यात आली आहे. तसचं अध्यादेशाबाबत हरकती आणि आक्षेप दाखल करायला सुरूवात करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशावर राज्य सरकारने हरकती आणि आक्षेप मागवलेले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्हात ओबीसी समन्वय समितीकडून हरकती दाखल केल्या जात आहेत. कुणबी प्रमाणपत्र वाटप करु नये, सगेसोयरे हा शब्द प्रयोग रद्द करावा, शिंदे समिति बरखास्त करावी असे आक्षेप दाखल केले जात आहेत. येत्या 16 तारखे पर्यंत जिल्हाभरात ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com