व्हिडिओ
छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार! मौखिक परीक्षेत विचारले विद्यार्थिनींना धार्मिक प्रश्न
छत्रपती संभाजी नगर परिसरातील वाळुज मधील फार्मसी कॉलेजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर परिसरातील वाळुजमधील फार्मसी कॉलेजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मौखिक परीक्षेत मुलींना धार्मिक प्रश्न विचारल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.
बाहेरून आलेल्या एक्स्टर्नल परीक्षकाने मौखिक परीक्षेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना धार्मिकतेवर प्रश्न विचारले. त्यांनी धार्मिक चालीरीतीवरून मुलींना प्रश्न विचारले.
धार्मिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात दाखल होत त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावरुन वाळुजमधील फार्मसी कॉलेजमध्ये तब्बल तीन तास तणाव निर्माण झाला.
संबंधित प्रकाराबद्दल मुलींनी प्राचार्यांना लेखी अर्ज करून तक्रार केली आहे. मात्र, अजूनही यावर कार्यवाही करण्यात आली नाही.