Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर सजलं, भाविकांची मोठी गर्दी

आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आणि या निमित्ताने गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे आणि या निमित्ताने गणेश मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. वर्षातून 2 वेळा अंगारकी चतुर्थी येते.

मध्यरात्रीपासून दर्शन रांगेला सुरुवात झाली आहे. सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे. या अंगारकी चतुर्थीबाबत सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी यांनी अंगारकी चतुर्थीबाबत माहिती दिली आहे, तसेच घरी कशा प्रकारे पूजा केली पाहिजे याबाबत माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com