व्हिडिओ
महायुती सरकारमध्ये 'या' ४ लाडक्या बहिणींना संधी
महायुती सरकारमध्ये चार लाडक्या बहिणींना संधी मिळाली आहे. आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देवेंद्र फडणवीस 3.0 सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज नागपुरात पार पडला आहे. महायुतीच्या फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारमध्ये ४ महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचा कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदावर समावेश झाला आहे. तसेच, राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे.
भाजपच्या माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांची पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. मेघना बोर्डीकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर पंकजा मुंडे आणि अदिती तटकरे यांनी महिला व बालकल्याण विभागाचे मंत्रिपद याआधी भूषविले आहे. त्यामुळे आता त्यांना कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.