Navneet Rana: राणांच्या उमेदवारीला भाजपच्या अनुसूचित जातीकडून विरोध

सोलापूरसारखा अमरावतीतही निर्णय व्हावा असं सिद्धार्थ वानखडे म्हणत आहेत. नवनीत राणांच्या उमेदवारीला अनुसूचित जातीकडून विरोध झाला आहे.
Published by :
Sakshi Patil

सोलापूरसारखा अमरावतीतही निर्णय व्हावा असं सिद्धार्थ वानखडे म्हणत आहेत. नवनीत राणांच्या उमेदवारीला अनुसूचित जातीकडून विरोध झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंकडे या संदर्भात मागणी केली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षाचे नेते विरोध करत असताना आता थेट भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाने देखील विरोध केला आहे. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत, अमरावती जिल्हा भाजपने साकडं घालत राणांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली.

तर राणा दाम्पत्य सन्मानाची वागणूक देत नाही तर भाजपमध्ये प्रामाणिक काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी अनुसूचित जमाती भाजपचे महाराष्ट्र सचिव सिद्धार्थ वानखडे यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com