नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

नागपुरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल आहे
Published by :
Team Lokshahi

नागपूर: नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. नागपुरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल आहे.

नरेंद्र नगर रेल्वे ब्रीज खालील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूने रस्ता बंद करण्यात आला आहे. ब्रीज खाली पाणी साचल्याने पाण्यात ट्रक अडकला आहे. रात्री बारा नंतर जोरदार मेघगर्जनेसनेसह तुफान विजांचा कडकडाटही सुरू झाला असून, सुमारे चार तास मुसळधार पाऊस कोसळला. गडचिरोली, चंद्रपूर , गोंदिया, भंडारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासोबत नागपूर यवतमाळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com