Mumbai: बोरिवलीत रन फॉर सोल्जर मॅरेथॉनचं आयोजन

आज भाजपा बोरिवली विधानसभा आणि बच्चूभाई समजीभाई ट्रस्ट यांच्या तर्फे 'रन फॅार सोल्जर' ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
Published by :
Team Lokshahi

आज भाजपा बोरिवली विधानसभा आणि बच्चूभाई समजीभाई ट्रस्ट यांच्या तर्फे 'रन फॅार सोल्जर' ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांसाठी सुद्धा विशेष वॉकेथॉन इन सारीचे आयोजन करण्यात आले होते. बोरीवलीच्या अनेक महिलांनी नऊवारी साडी नेसून ह्या स्पर्धेत भाग घेतला. सकाळी 6 वाजता आमदार सुनिल राणे यांनी झेंडा दाखवून वॉकेथॉन स्पर्धेची सुरुवात केली. नंतर स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ झाला. याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील कर्नल मनचंदा व माजी सैनिक कमांडो मधुसूदन सुर्वे, नगरसेविका बिना दिशी आणि आयोजक दिनेश झाला उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com