Palkhi Sohala : पुण्याचा निरोप घेतल्यानंतर माऊली, तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे मार्गस्थ

दोन्ही पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहेत.

दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुणेकरांचा निरोप घेत पुढे मार्गस्थ झाली आहे. दोन्ही पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे जात आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज आज दिवेघाटाची अवघड चढण पार करत सासवड येथे मुक्कामी असतील. लाखो वारकरी आज माऊलींसोबत दिवेघाट सर करणार आहेत. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर मार्गे पुढे जाऊन लोणी काळभोर येथे मुक्कामी असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com