व्हिडिओ
Pankaja Munde: "..तर या जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल" पंकजा मुंडे पत्रकारांसोबत बोलताना संतापल्या
पंकजा मुंडे संतापल्या: 'जर तुम्ही मला आणखी काही विचारणार असाल, तर तुम्ही या जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल' - पर्यावरण मंत्री म्हणून कडक कारवाईची चेतावणी.
पंकजा मुंडे माध्यांशी बोलताना म्हणाल्या की, पर्यावरण मंत्री म्हणून आणि संपर्क मंत्री म्हणून मला कोणतीही बंधन नाही की मी कोणत्याही क्षेत्राची बैठक घ्यावी. काही गोष्टी विषयी माझा स्वतःचा आक्षेप होता म्हणजे, प्रदूषणाचा आक्षेप... काही बातम्या आल्या त्यानुसार राखेंचं प्रदूषण, वाळूचा अवैध्य उपसाह हा थांबवण्याचा आदेश मी दिला आहे.. राखेचं ट्रान्सपोर्ट कोण कसं करतो हा आमचा विषय नाही, पण जी राख नेली जाते ती बंद कंटेंनरमधून नेली पाहिजे..
पोलिस घाबरतात या सगळ्याविषयी कारवाई करायला पण, मी त्यांना सरळ बोलले आहे की जे कोणी नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच पंकजा मुंडे म्हणाल्या की, पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही मला आणखी काही विचारणार असाल, तर तुम्ही या जिल्ह्याला आणखी खड्ड्यात घालाल.