Pankaja Munde Maharashtra Cabinet: पंकजा मुंडेंना कोणत्या खात्याची अपेक्षा? म्हणाल्या...

पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या खात्याबद्दलच्या अपेक्षांबद्दल सांगितले. मंत्रिमंडळात कोणते खाते मिळेल याची उत्सुकता कायम आहे.
Published by :
Team Lokshahi

कालच आमदारांकडून मंत्रिपदाच्या शपथ घेण्यात आल्या आणि त्यादरम्यान पंकजा मुंडेंनी त्यांना कोणत्या खात्याची अपेक्षा आहे याबद्दल सांगितले आहे. तर याचपार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे खुप आनंद झाला आहे मला माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना सगळ्यांना आनंद झाला आहे. यावेळेस बरेचसे भाऊ-भाऊ, भाऊ-बहिण आहेत.

ज्यात कोकणचे राणेंचे दोन भाऊ आहेत, संतोष दानवे आणि त्यांच्या बहिण आहेत. तर यावेळी बऱ्याच जोड्या आहेत. कॅबिनेट खात्याबद्दल आधी देखील कोणती अपेक्षा नव्हती आणि आता देखील नाही आहे, ते जेव्हा मिळेल तेव्हा समजेल तुम्हाला आणि कामाचं म्हणायला गेले तर आधी देखील मी तेवढचं काम करायचे आणि देखील तेवढच काम करणार आहे थोड नियोजनाची गरज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com