व्हिडिओ
Pankaja Munde | 'राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं' मुंडेंचं वक्तव्य
पंकजा मुंडे यांनी राजकारणातील गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं असल्याचं वक्तव्य केलं. जालन्यातील कार्यक्रमात त्यांनी टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केली.
जालना येथे शिवसेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे. आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची, काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात. कशातही आपलं नाव ओढतात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर खंत व्यक्त केलीय.