मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज

तब्बल 40 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला...विस्तारानंतर शिंदे गटात नाराजी होती...आता भाजपमधील नाराजी उघडपणे समोर आली आहे... मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान दिले जाईल, अशी चर्चा होती... मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाले पंकजाने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली..

पंकजा मुंडे यांनी रक्षाबंधनानंतर माध्यमांशी बोलतांना मन की बात उघड केली. वरीष्ठ नेत्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रीपद दिलं नसेल असा थेट टोला त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला. पंकजा यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा भाजपमधील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. तसेच पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मला मुख्यमंत्री होता आले नसले तरी, राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री मीच आहे, असे वक्तव्य पंकजा यांनी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पंकजा यांना दूर केले. पंकजा अनेक वेळा मनातील खदखद व्यक्त करत राहिल्या. पण भाजप पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांच्या 'मन की बात' ऐकलीच नाही. आता सत्तांतरात पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा आदेश दिले. फडणवीस नाराजही झाले होते. फडणवीसांना पुन्हा धक्का देण्यासाठी पक्षश्रेष्ठी पंकजा यांना मंत्रिमंडळात स्थान देतील, अशी चर्चा होती. पण फडणवीसच किंगमेकर राहिले. आता भाजपमध्ये पंकजा मुंडेंचा एकनाथ खडसे होणार का? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com