Kalyan : कल्याणमध्ये इमारतीचा भाग कोसळला; तरुण थोडक्यात बचावला

कल्याणमध्ये 4 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

कल्याणमध्ये 4 मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. इमारतीचा काही भाग बाजूच्या मंदिरावर कोसळला. दुर्घटनेमध्ये तरुण थोडक्यात बचावला, तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. तर पालिका फक्त नोटीस देते कारवाई करत नसल्याने एखाद्याचा जीव गेल्यानंतर पालिका जागी होईल का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com