Prashant Paricharak : प्रशांत परिचारक यांच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचे फोटो गायब, चर्चांना उधाण

प्रशांत परिचारकांच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचे फोटो गायब झालेले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

प्रशांत परिचारकांच्या बॅनरवरुन भाजप नेत्यांचे फोटो गायब झालेले आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारकांच्या बॅनरची पंढरपुरात जोरदार चर्चा सुरु आहे. भाजप नेत्याच्या बॅनरवर फक्त एकनाथ शिंदेंचा फोटो दिसत आहे. प्रशांत परिचारक भाजपला रामराम करत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार? अशीही चर्चा आहे. बॅनरवरुन भाजप नेत्यांचे फोटो वगळल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. लोकसभा निकालानंतर परिचारक भाजपपासून चार हात लांब आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये परिचारक मोठा राजकीय निर्णय घेण्याची चर्चा सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com