व्हिडिओ
Kalyan | New Year | थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर, कल्याणमध्ये चोख बंदोबस्त तैनात
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर, कल्याणमध्ये चोख बंदोबस्त तैनात. सुरक्षिततेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नका, वाहतूक पोलिसांचे आवाहन.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज थर्टी फर्स्ट डिसेंबर निमित्त नागरिकांनी पार्टीचे प्लॅन आखले आहेत. सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. मात्र या उत्साहाच्या भरात मद्यपी दारू पिऊन गाडी चालवतात त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून अनेकदा अपघात घडत असतात, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, सुरक्षिततेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नका, असा आव्हान कल्याण वाहतूक पोलिसांनी केलं आहे. थर्टी फर्स्ट मजेत साजरा करा पण शिस्त पाळा, दारू पिऊन गाडी चालवू नका, याबाबत जनजागृती करण्यासाठी आज सकाळपासूनच कल्याण वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. आज सकाळपासूनच चौका चौकात वाहतूक पोलिसांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यावेळी दुचाकी स्वर तसेच वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी नियम पाळण्याचे आवाहन करत त्यांच्या हातात बँड बांधले.