Amaravati | अमरावतीच्या महिला रुग्णालयात दोन तासांपासून वीज गायब

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मागील दोन तासापासून विजपुरवठा खंडित झाला आहे.
Published by  :
Team Lokshahi

अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मागील दोन तासापासून विजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळं गर्भवती महिला आणि लहान बाळांचे हाल होत आहेत. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला माहिती विचारणा केली असता, लाईनचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास 250 गर्भवती महिला या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. वीज नसल्याने गर्मीने रुग्ण हैराण झाले आहे तर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने 5 वाजता वीज पुरवठा सुरू होईल अशी माहिती आहे. मात्र वीज नसल्याने सर्वत्र काळोख पसरला आहे. याबाबत माहिती मिळताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयाच्या डॉक्टरांना त्यांनी चांगलंच फैलावर घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com