Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांकडून 9 उमेदवारांची घोषणा

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकर आता 'एकला चलो'चा नारा देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
Published by :
Sakshi Patil

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकर आता 'एकला चलो'चा नारा देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. प्रकाश आंबेडकरांकडून 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिममधून उमेवार जाहीर करण्यात आले आहे. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुक लढणार आहेत. जरांगेंसोबत वंचितची सामाजिक युती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. बारामतीतून प्रकाश शेंडगे लढल्यास पाठिंबा देणार असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

वंचितकडून 9 उमेदवार जाहीर

गडचिरोली-चिमूर- हितेश पांडुरंग मढावी

चंद्रपूर- राजेश वारलुजी बेले

बुलढाणा- वसंत राजाराम मगर

भंडारा-गोंदिया- संजय केवट

अकोला- प्रकाश आंबेडकर

अमरावती- प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान

वर्धा- प्रा.राजेंद्र साळुंके

यवतमाळ-वाशिम- खेमसिंग प्रतापराव पवार

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com