Sanjay Raut on Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंसोबत युती तोडली; काय म्हणाले राऊत?

आम्ही त्यांच्यासोबत वारंवार विनंती केलेली, आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता परंतु आम्ही आशा सोडलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेब आंबेडकर सोबत असतील किंवा नसतील तरीही आम्ही जिंकूच. महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असते तर हा विजय अजून दैदिप्यमान झाला असता म्हणजे आमचं मताधिक्य वाडलं असतं. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही परावलंबी आहोत.

महाराष्ट्रातील शोषित वंचित पीडित जनतेला आम्ही घेत आहोत आणि ही जनता आमच्या सोबतच आहे. बाळासाहेब आंबेडकर सन्माननीय नेते आहेत, त्यांचं संघटन महत्वाचं आहे. आम्ही त्यांच्यासोबत वारंवार विनंती केलेली, आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता परंतु आम्ही आशा सोडलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com