Prakash Shendge On Prakash Ambedkar: आंबेडकरांचे भुजबळांना ते आवाहन, शेंडगेंची प्रतिक्रिया काय?

ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं, वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना आवाहन केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं, वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी भुजबळांना आवाहन केलं आहे.

प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसी समाजासाठी स्वतंत्र असा वेगळा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे घोषित केले आणि त्याचबरोबर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी नेता तथा मंत्री छगन भुजबळ यांना देखील यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

याच निमंत्रणाला अनुसरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सल्ला देऊन राजकीय चिमटा काढला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी पक्षात जावे आणि त्याचे नेतृत्व करावे तर आम्ही देखील त्यांना राजकीय पाठिंबा देऊ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com