Prakash Ambedkar ON Amit Shah: अमित शाह यांच्या संसदेतील भाषणावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले पाहा...
अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वक्तव्य केल होत. अमित शाहांचा संसदेतील भाषणाचा व्हिडियो कॉंग्रेसनं ट्विट केला आहे. 'आजकाल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर असा जप काही लोक करत असतात. एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखाद्याला स्वर्गात जागा मिळेल.' असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. या व्हिडियोवरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
याचपार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, ती जी जुनी विचारधारणा आहे ती पुन्हा बाहेर पडलेली आहे... त्याच्यामुळे त्यात नाविन्य काही आहे असं मी मानत नाही, त्यांचे त्यावेळेसचे जे काही प्लॅन होते, ते अजून सुद्धा आमलात न आणणं हे सगळ्यात अडचणीचं कॉंग्रेस पक्षाला आहे... तर ते बाबसाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जळफळाट हा होत राहणार अशी परिस्थिती आहे.