Prakash Ambedkar : ..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आल्याचे काल जाहिर केले होते. यावर प्रकाश आंबेडकरांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

अकोला : महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. मात्र भाजप आणि आरएसएसला बाजूला करण्यासाठी आम्ही आमचं इगो बाजूला ठेऊ, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हंटलं आहे. तर 2 फेब्रुवारीला होणाऱ्या मात्र आघाडीच्या बैठकीत आपण स्वतः आणि महत्त्वाचे पदाधिकारी हजर राहणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला असल्याच्या चर्चेत कोणतही तथ्य नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

जोपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ पत्रावर सही करत नाही तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो नाही असे समजावे, असंही त्यांनीम्हंटले आहे. तर 2 फेब्रुवारीच्या सभेत जागा वाटपासोबत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा होईल, अशी आशा असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com