व्हिडिओ
योगेश कदमांच्या 'त्या' वक्तव्यावरुन प्रकाश आंबेडकर यांचा फडणवीसांना सवाल, म्हणाले...
स्वारगेट बलात्कार प्रकरणी योगेश कदम यांच्या विधानावर प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल, मंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याचा निषेध
स्वारगेट बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. असं विधान करणे हे दुर्दैवी आहे. मंत्र्यांच्या अशा वक्तव्याचे बळ हे आरोपीला आणि पोलीस खात्याला मिळतं असा आरोप आंबेडकरांनी केला. अशा असंवेदनशील मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावे असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असंही ते म्हणाले.