Pranit More : हल्ल्याप्रकरणी प्रणित मोरेने व्यक्त केली खंत म्हणाला, "माझ्यासोबत काय झालं..."
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर प्रणित मोरे हा सध्या खूप चर्चेत आहे. २ फ्रेबुवारीला सोलापूरमधील स्टँडअप शो झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वीर पहारियावर विनोद केल्याप्रकरणी प्रणितला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये प्रणित गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा निषेध चाहत्यांनी नोंदवला होता. याच संदर्भात वीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रणितला पाठिंबा दिल्याचे पाहावयास मिळाले.
याच संदर्भात प्रणित मोरेने आपली पहिली प्रतिक्रिया, 'लोकशाही मराठी'ला दिली आहे.
प्रणित मोरे याच्यावर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय झाले? याबद्दल प्रणितने सांगितले, प्रणित म्हणाला की, " मी सोलापूरकरांचे आभार मानतो. सोलापूरकरांनी मला खूप पांठिबा दिला. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणातील ५ जणांना पकडले असून, मुख्य आरोपी फरार आहे. माझी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करावी अशी माझी विनंती आहे. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे. माझ्यासोबत काय झाले सीसीटीवी कॅमेरामध्ये स्पष्ट दिसत आहे. मी केलेली शेवटची पोस्ट सर्वापर्यंत पोहचली तसेच हा व्हिडीओ सर्वांपर्यंत पोहचला पाहिजे",असे म्हणत सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर प्रणित मोरेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.